सभागृहात २०० सदस्यांची संख्या फार काळ टिकत नसल्यामुळे राजस्थान विधानसभेत फूट असल्याच्या अफवांचं पेव फुटलं आहे.कुठला आमदार तुरुंगात जातो, कधी कुणी राजीनामा देतं. सहा महिन्यांच्या कालावधीत दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही आमदारांना अस्वस्थ वाटायला लागलं. आत्मा असल्यामुळे हे घडत असल्याचा गैरसमज आमदारांनी करुन घेतला आहे.काही आमदारांनी थेट मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. यज्ञ करुन भूतबाधा दूर करावी, असं साकडं यावेळी भाजप आमदारांनी घातलं.स्मशान भूमीच्या जागेवर विधान सभेची वास्तू उभारली आहे. त्यामुळे वाईट शक्तींचा वावर इथे आहे, म्हणून हे प्रकार घडत असल्याचा अंदाज आमदारांनी व्यक्त केला आहे.लाल कोठी स्मशानभूमी ही या इमारतीच्या जवळच आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews