एप्रिल व मे महिन्यांत रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महाराष्ट्रात रिक्त होत असलेल्या सहापैकी तीन जागांवर विजय मिळवणे भाजपला शक्य होणार आहे. त्यामुळे मागील वेळी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे.राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे १२२ आमदार असलेल्या सत्ताधारी भाजपला तीन, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक, राष्ट्रवादीला एक खासदार राज्यसभेवर पाठवता येणार आहे. कोटा आणि आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता कोणताही पक्ष अतिरिक्त जागा लढवण्याच्या परिस्थितीत नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews