केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येतील राममंदिरा बाबत म्हटले आहे की, मुळची ही जागा बौद्ध स्तुपाची असून सध्या २ समाजात सुरू असलेल्या वाद मिटावा यासाठी यामध्ये आपण वादामध्ये पडत नाही. मात्र हिंदू आणि मुस्लीम बांधवांमध्ये समेट घडवून आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. रामदास आठवले म्हणाले, की देशात आणि राज्यात आर्थिक निकषावर मराठा आणि ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळावे, अशी आपण वारंवार मागणी करत आलो आहोत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews