लखनौच्या दर्यापूर येथील भैसहवा येथे राम मिश्र आपल्या मुलगा जगदीश याच्याबरोबर राहतात. म्हातारपणामुळे जगदीशला त्यांची सेवा करावी लागत होती.शनिवारी राम यांनी अंथरुणातच शौच केले. यामुळे जगदीशचा पारा चढला त्याने वडिलांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि धारदार सुऱ्याने वडिलांचा गळा चिरला. गळा चिरल्यानंतर वडील मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागले.त्यानंतर त्याने कपाटातून फेविक्विक आणले व ते वडिलांच्या गळ्याला लावून गळा चिकटवण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र गळ्यातून होणारा रक्तस्त्राव पाहून जगदीश घाबरला व तिथून पळून गेला.राम मिश्र यांचा आरडाओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना बोलावले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि राम मिश्र यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews