2019 च्या विधानसभा निवडणूकीनी अनेक धक्कादायक निकाल दिले. तसेच राज्यातल्या राजकारणाचे समिकरणही पूर्णपणे बदलून टाकले. शरद पवार पुन्हा एकदा या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये मुख्य सूत्रधार म्हणून समोर आले. ज्या ठाकरे घराण्यानी फक्त मातोश्रीवरून रिमोट कंट्रोलद्वारे पक्ष आणि सरकार चालवला, त्याच ठाकरे घराण्याचे दोन सदस्य आता अनुक्रमे विधानसभेत आणि विधान परिषदेत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे विधान परिषदेवर निवडून येणार आहेत. या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या निवडणूकीत सगळ्यात मोठा फटका बसला तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. मी पुन्हा येईन अशी घोषणा त्यांनी केली होती. पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून काही येता आलं नाही. ते आता विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. याशिवाय वर्षभरात सगळ्यात जास्त गाजली ती सातारा लोकसभेची पोटनिवडणूक. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि भाजपात डेरेदाखल झाले. पण शरद पवारांनी आपली कमाल दाखवत लहानपणीचे मित्र श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आणि उदयनराजेंना पराभूत करण्याची रणनिती आखली. अखेरच्या प्रचारसभेत भर पावसात भिजत त्यांनी केलेले भाषण अवघ्या देशात गाजले. ८० वर्षांचा नेता भर पावसात भिजत भाषण करतो याचे चित्र सगळ्या देशानी पाहिले आणि तिथेच फक्त साताऱ्याचाच नाही तर राज्याचा निकाल फिरला. एकट्याच्या जोरावर पवारांनी पक्षाला ५४ जागा मिळवून दिल्या. शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. थोडक्यात काय तर काँग्रेसच्या नेत्यांनी थोडा जोर लावला असता. आपला राष्ट्रीय नेते प्रचाराला उतरवले असते तर काँग्रेसच्याही काही जागा वाढल्या असत्या. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर कोणाला किती फायदा झाली आणि किती नुकसा झाले याचा आढावा घेणारी ही स्टोरी.
#sharadpawar #uddhavthackeray #devendrafadanavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Newyear #2019 #maharashtrapoliticalnews #Nationalnews
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क