भायंदर पूर्वमध्ये एक गौशाला राजकीय डावपेचांचा शिकार झाली. त्यात काही गायीदेखील जखमी झाल्या आहेत. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी ही गौशाला बांधली होती. पण शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या महापालिकेनी भाजपासोबत काडीमोड होताच भाजपाच्या आमदाराने सुरू केलेली गौशाळा तोडली. ही गौशाळा सीआरझेड म्हणजेच समुद्र किनाऱ्यावरच्या प्रतिबंधीत क्षेत्रात बांधण्यात आली होती. मात्र तिथल्या गायींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर न करता, महापालिकेनी ही गौशाळा तोडण्याची कारवाई केली ज्यात काही गायी जखमी झाल्या आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घेराव घालून गायींचा उपचार करण्याची मागणी केली. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी ही मागणी मान्य करून जखमी गायींवर महापालिकेतर्फे उपचार केले जातील असं आश्वासन दिलं ..
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #BJPandShiv Sena #MiraRoad
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019