दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीमधे होणार आहे. म्हणजेच आता उरले आहेत फक्त दोन महिने आणि काही दिवस. सध्या दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार आहे. आणि मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. जनतेच्या आंदोलनतू उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षाला दिल्लीत थेट सरकारमध्ये बसवून दिल्लीच्या जनतेनी देशाच्या राजकारणात एक मोठा प्रयोग केला होता. आणि एक संदेशही दिला होता. जर जनतेनी ठरवलं तर प्रस्थापित पक्षांना धक्का देऊन त्यांचा पक्ष सत्तेवर बसवण्याची ताकद जनतेमधे आहे, हे या निकालानी दाखवून दिलं होतं. हा प्रयोग सगळ्याच राजकीय पक्षांच्या अस्तित्वाला आव्हान देणारा होता. गेल्या पाच वर्षांत केजरीवाल सरकारनी चांगली कामंही केली, पण ती देशाच्या समोर मांडण्यात केजरीवाल अपयशी ठरले. आता निवडणूक दोन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे साहजिकच राजकारण चांगलंच तापलंय. केंद्रातल्या मोदी सरकारनी दिल्लीतल्या १ हजार ७२८ अनधिकृत कॉलन्या किंवा वस्त्यांना अधिकृत करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या संदर्भातलं विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेतही मंजूर करण्यात आलंय. अर्थात, हे विधेयक गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. पण त्याला मुहूर्त लागला तो निवडणूकीच्या आधीचा. भाजपाला दिल्लीच्या निवडणूकीत सत्ता मिळवायची आहे. पण हे सोपं काम नाही , याची त्यांना जाणीव आहे.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Narendramodi #bjp #amitshah #delhividhansabha
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019