Snake | गवत्या सापांचे चालले द्वंद्वयुद्ध! | Solapur | Maharashtra | Sakal Media
सोलापूर : बाळे येथील लक्ष्मीनगर परिसरात राहात असलेले रमेश तोडकरी यांची मुलगी पूनम ही भांडी घासण्यासाठी बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला घराच्या अंगणात दोन साप दिसले. पूनमने प्रसंगावधान राखून वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोसिएशनचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना फोन करून दोन सापांचे मीलन होत असल्याची माहिती दिली. रात्रीची वेळ असून देखील त्या दोन सापांना बघण्यासाठी गर्दी जमली होती. परंतु घटनास्थळी पोचल्यानंतर क्षीरसागर व त्यांच्या सहकार्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते साप विषारी साप नसून गवत्या प्रजातीचे बिनविषारी साप होते. नेहमी शांत स्वभावाचा असणारा हा गवत्या साप त्या रात्री द्वंद्वयुद्ध करताना वाईल्डलाईफ कॉंझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांना पाहता आले. एकदम कडकडून एकमेकांना चावा घेत ते दोन साप रक्तबंबाळ झालेले होते. जवळपास दीड तासापासून या सापाचे भांडण चालू होते. (बातमीदार : प्रकाश सनपूरकर)
#Solapur #Snake #Gavtyasnake #Maharashtra