How To Make Natural Sanitizer? Ayurvedic hand Sanitizer | Homemade Hand Sanitizer

Lokmat 2021-09-13

Views 6

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी मास्क व सेनेटिझिझर्सचा वापर करणं अनिवार्य आहे. पण त्याच्या वाढत्या मागणी मुळे उत्पादनाचा अभाव आहे. किंबहुना मिळत असलं तरी ते महाग किमतीत मिळत आहे. सर्वनाच परवडेलच असं नाही, त्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक हॅन्ड सॅनिटायझर तुम्ही स्वतः बनवू शकता, तेही घरी उपलब्ध असलेल्या सामग्रीने.

बाबा रामदेव यांनी घरगुती आयुर्वेदिक हात सॅनिटायझर कसे बनवायचे हे सांगितलं आहे. ते पूर्णपणे हर्बल आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय याला बनवायला जास्त मेहनत किंवा पैसे मोजावे लागत नाही. अगदी १५ मिनिटात तुम्ही हे हॅन्ड सॅनिटायझर बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कसा बनवायचा आयुर्वेदिक हॅन्ड सॅनिटायझर.

यासाठी लागणारं साहित्य:
1 लिटर पाणी
100 कडुलिंबाची पाने
10-20 तुळशीची पाने
10 ग्रॅम तुरटी
10 ग्रॅम कापूर
कोरफड

या प्रत्येक सामग्रीचे आरोग्यदायी गुणधर्म आहेत जसं की :

कडूलिंब ही औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणारा कडुलिंब अनेक रोगांवर गुणकारी आहे आणि शरीरासाठी लाभदायक आहे.

तुळशी एक औषधी आहे. ज्याने त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुळशीचा वापर त्वचेसाठी केल्यास बाजारातील कोणत्याही महागड्या क्रिमची गरज भासणार नाही.

तुरटीमध्ये मॅग्नेशियम असतं ज्या मुळे शरीरातील हानिकारक पदार्थ निघून जातात.

कापूर बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

कोरफड जेलमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे लहानमोठी जखम, कापलं अथवा भाजलं असल्यास, फर्स्ट एड म्हणूनदेखील वापर करता येतो.

आता या आयुर्वेदिक हॅन्ड सॅनिटायझर ची कृती पाहुयात:

एका भांड्यात १ लिटर पाणी घ्या आणि त्यात कडुलिंब आणि तुळशीची पाने घाला. थोडा पाणी उकळल्यावर त्यात कोरफड घाला. पाणी 600 ते 700 ml शिल्लक राहिले कि त्यात कपूर आणि तुरटी घाला. थोडा थंड झाल्यावर एका बॉटल मध्ये हे पाणी गाळून घ्या. आणि नंतर बॉटल नीट हलवून घ्या जेणेकरून सर्व एकत्र मिक्स होईल. अशा प्रकारे तयार आहे आयुर्वेदिक हॅन्ड सॅनिटायझर.

#lokmat #ayurvedic #handsanitizer #homemade
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधना

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS