अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची लेक जिजा कोठारे हिचे व्हिडिओज सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. व्हिडिओमध्ये तिने केलेली धमाल आणि मजामस्ती चाहत्यांना पसंतीस पडत असतात. आता जिजाच्या आणखी एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलयं. या व्हिडीओमध्ये जिजाने कोरिओग्राफर फुलवा खामकर हिला तिच्या वाढदिवसानिमित्त खास सरप्राईज दिलयं. याचा व्हिडीओ उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. उर्मिला जिजाला घेऊन अचानक फुलवाच्या घरी पोहचते. आणि फुलावाने दरवाजा उघडल्यावर जिजा जोरात हॅपी बर्थ डे फुलवा मावशी असं म्हणताना दिसतेय. जिजाने दिलेलं हे सरप्राईज फुलवाला खुपच पसंतीस पडलयं. आणि व्हिडीओतील जिजाचा क्युट अंदाज देखील चाहत्यांना पसंतीस पडलाय. याशिवाय फुलवाने घरी आईस्क्रिम खातानाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलाय.
Snehal vo