Corona vaccination awareness : नृत्य-गीतातून तांड्यावर महिलांचा जागर | Jalna | Sakal Media
जालना : कोरोना संसर्गजन्य प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जनजागृतीसाठी शाळांमधून ' कवच कुंडल ' अभियान राबविण्यात येत आहे. श्रीरामतांडा ( ता.मंठा ) येथील बंजारा बोलीभाषेत महिलांनी गीत-नृत्य सादर करीत लसीकरणाबाबत आवाहन केले.' लस लेरो केरो तांडे वाळेनो ' बनजारो लस तम ले लो..रं...' अशा लोकगीतातून महिला पारंपारिक वेशभूषेत लसीकरण जनजागृती करीत आहेत,हे विशेष. महिलांच्या गीत-नृत्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. (व्हिडिओ - सुहास सदाव्रते )
#Jalna #corona #Coronavaccination #awareness