Black Panther Spotted At Mahabaleshwar : महाबळेश्वर तालुक्यात ब्लॅक पँथरचं दर्शन

Sakal 2021-09-22

Views 2

Black Panther Spotted At Mahabaleshwar : महाबळेश्वर तालुक्यात ब्लॅक पँथरचं दर्शन

Kaas (Satara) : महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यात दुर्गम कुमठे गावात ब्लॅक पँथर (Black Panther, काळा बिबट्या) आढळला. चतुरबेट, दूधगाव, पार आदी दुर्गम गावांच्या परिसरात कुमठे गाव आहे. येथे या ब्लॅक पँथरचं दर्शन झालं आहे. कुमठे गावात सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीचे शेताजवळ हा काळा बिबट्या आढळला. त्यांच्या शेतामध्ये रवींद्र जाधव, सुभाष जाधव गाई चारण्यासाठी गेले असता त्यांना तेथे हा ब्लॅक पँथर (Black Panther, काळा बिबट्या) दिसला. शेत गावापासून अगदीच १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(व्हिडीओ : सूर्यकांत पवार)

#BlackPanther #mahabaleshwar #kaas #satara

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS