भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा पाढा वाचून दाखवला. करोनाऐवजी राज्यात महिला अत्याचाराची तिसरी लाट येईल, असंही त्या म्हणाल्या. राज्यातील महिलांच्या वाढत्या अत्याचारांवर विशेष अधिवेशन घेण्यासाठी केलेल्या राज्यपालांच्या पत्राला दिलेल्या उत्तरावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.