मेघालयात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.
रोवेल लिंगहोड काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री आहेत. सोबत राजीनामा दिलेल्या सर्व आठ आमदारांनी पुढील आठवड्यात एका जाहीर कार्यक्रमात पी. ए. संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. साठ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे ३० सदस्य आहेत. या पूर्वीही काँग्रेसचे आमदार राजीनाम्यानंतर विधान सभेत काँग्रेसचे संख्याबळ २४ वर आले आहे. सध्याच्या विधानसभे ची मुदत सहा मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस आमदारांनी पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात बंड करून राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या पाच आमदारांमध्ये चार माजी कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. अकार्यक्षमेत च्या आरोपावरून मुख्यमंत्र्यां नी त्यांचा नुकताच राजीनामा घेतला होता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews