Pimpri : ग्रेड सेपेरेटरमध्ये अडकला कंटेनर; वाहतूक कोंडीत अडकल्या 4 रुग्णवाहिका
Pimpri : पुण्याहून चिंचवडकडे जाताना मध्यरात्री एक कंटेनर ग्रेड सेपेरेटरमध्ये अडकला. त्यावेळी कंटेनर मधील चालक पळून गेला. सकाळी वाहतूक पोलीस तसेच पोलीस विभागातील कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी वाहतूक नियंत्रित केली. कंटेनर काढायला सुरुवात केली आहे पण वाहतूक बाहेरून वळविण्यात आल्यामुळे पिंपरी चौकात वाहतूक कोंडी झाली आहे. आत्ता पर्यंत वाहतुकीत त4 रुग्णवाहिका अडकल्या होत्या. नागरिक वाहतूक कोंडीस वैतागले आहेत.
(संतोष हांडे)
#PimpriChinchwadMunicipalCorporation