यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती आविष्कार दारव्हेकरने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. पहिल्या दिवसापासूनच या दोघांच्या भूतकाळाबद्दल घरात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. अलिकडच्या भागात आविष्कारने त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी विषयी आणि त्यांचे हे लग्न का मोडले या विषयी मोठा खुलासा केला आहे.