जिंतूर (जि.परभणी) : येलदरी धरणाचे बुधवारी सकाळी काही दरवाजे दोन व तीन मीटर उघडून वीजनिर्मितीसह एक लाख तीन हजार २६१.५० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ऊर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात होणारी आवक यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने मंगळवारी (ता.२८) संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास धरणातून एकूण ५३,६३६.७६ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. (व्हिडिओ - राजाभाऊ नगरकर)
#jintur #parbhani #yeldaridam # #parbhaninews #parbhaniliveupdates #parbhaninewsupdate