जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याचे तिसरे पर्व सुरू झाले आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांचे जंगी स्वागत केले. जोरदार पाऊस सुरु असूनही या कार्यकर्त्यांच्या उत्साहात कोणतीही कमी नव्हती. “माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती” अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी यावेळी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
#JayantPatil #JCB #Parli #Beed #Maharashtra