तब्बल १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत धमाल उडवली होती. मराठीतील विनोदाचा धमाका असलेला 'दे धक्का' सिनेमा सर्वांचाच आवडता आहे. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केलीये. अभिनेता शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे अशा दिग्गज कलाकारांचा समवेश असलेल्या या सिनेमाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. आता चाहत्यांची हिच इच्छा पूर्ण झाली आहे. लवकरच दे धक्काचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. दे धक्का २ असं या सिनेमाचं नाव असणारे. याची माहिची दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत दिली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची रिलीज डेट सुद्धा महेश मांजरेकरांनी सांगितली आहे. हा सिनेमा १ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच नवीन वर्षांत प्रेक्षकांना विनोदाचा नवा डोस मिळणार आहे असं म्हणायला हरकतं नाही. (Snehal VO)
#DeDhakka #DeDhakka2 #SiddharthJadhav #ShivajiSatam #MakarandAnaspure
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber