#templereopen #maharashtra #satara #marathinews #esakal #sakal
गोंदवले (सातारा) : दीड वर्षानंतर प्रत्यक्ष माउलीच्या दर्शनाने धन्य झालेल्या भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. आज गोंदवल्यातील समाधी मंदिर उघडल्याने श्रींच्या ओढीची आस पूर्ण झाली. शिस्तीचे पालन करत भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे देखील गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. शासनाने परवानगी दिल्यानंतर आज घटस्थापनेदिवशी बंद मंदिरांचीद्वारे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर देखील आज भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव आता थंडावला असला तरी समाधी मंदिर समितीने भाविकांची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत भाविकांना दर्शन दिले जात आहे.
(व्हिडिओ : फिरोज तांबोळी, गोंदवले)