#kolhapur #chandgad #fatakwadi #fatakwadiproject #chandgadnews
चंदगड तालुक्यातील फाटकवाडी मध्यम प्रकल्पाच्या सर्व्हीस गेटला गळती लागली आहे. दोन वर्षापूर्वी सामान्य स्थितीतील या गळतीने आता मोठे स्वरूप धारण केले आहे. यामुळे प्रकल्पाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. सांडव्याची खचलेली संरक्षक भिंत, त्यालगत खचत चाललेले जंगल, मुख्य भिंतीवर वाढलेली झाडे-झुडपे आणि जमिनीचा सपोर्टेड भाग सुद्धा खचत चालल्यामुळे प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे खात्याने या प्रकल्पाच्या एकूणच व्यवस्थापनाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसते. वेळीच दुरुस्ती आणि नियमित देखभाल दुरुस्ती गरजेची आहे. (व्हिडिओ- सुनील कोंडुसकर, चंदगड)