महाराष्ट्रातील येवला शहरात दर मंगळवारी घोडेबाजार भरतो. या घोडेबाजाराला ४०० वर्षांची परंपरा आहे. नवरात्र काळात दसऱ्याच्या अगोदर येणाऱ्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरवला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य अश्वप्रेमी आणि घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी- विक्रीसाठी येत असतात.
#Navratri2021 #HorseMarket #Yeola