#kolhapur #kolhapurnews #kolhapurliveupdates #shriambabai #ambabai #indrani #indranimatruka
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची इंद्राणी मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. उद्या (बुधवारी) देवीचा जागर असून श्री अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने होणार आहे.
यंदाच्या उत्सवात सप्तमातृका संकल्पनेवर श्री अंबाबाई च्या पूजा बांधल्या जात आहेत. इंद्राणी मातृका देवांचा राजा इंद्राची शक्ती आहे. तिला महेंद्री किंवा वज्री असे म्हणतात. ती चतुर्भुज असून हत्तीवर आरूढ झाली आहे. तिच्या हातात वज्र, बोकड, पाश, कमळ आहे. विविध दागिन्यांनी ती सजली असून मुद्रा आक्रमक आहे, अशी माहिती श्रीपूजक सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर,विद्याधर मुनीश्वर यांनी दिली.
(बातमीदार - संभाजी गंडमाळे)
(व्हिडीओ - बी. डी. चेचर)