दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी षण्मुखानंद येथे पार पडला. मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषणातून विरोधकांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर टीका केली आहे.