राज्यातील नवरात्रोत्सव नुकताच पार पडला असून दिवाळीनंतर कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेतली जाईल. करोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना उघडलेल्या क्षेत्रामध्ये काही सवलती देता येईल का, याबाबतीत चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. हा निर्णय आरोग्य विभागाशी चर्चा करून घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले.