#karad #satara #sataranews #karadthief #karadnews #karadthief
कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड बसस्थानक (Karad Bus Stand) परिसरातून गाडी चोरताना शहर पोलिस ठाण्याच्या (Karad Police) गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयिताला रंगेहाथ पकडले. अजित भगवान खरात (वय 19, रा. लेंगरेवाडी पो. मारूगडे ता. आटपाडी जि. सांगली, सध्या रा. उजाला चौकी, सरकेज अहमदाबाद- गुजरात Gujarat) असे संशयिताचे नाव आहे. संबंधिताने आत्तापर्यंत गुजरात, पालघर, विटा आणि कऱ्हाड परिसरातून 16 मोटरसायकल चोरुन विकल्या असून त्याच्याकडून त्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर यांनी दिली. (व्हिडिओ : हेमंत पवार)