भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याचे औक्षण करते आणि भाऊ बहिणीला ओवाळिणी स्वरुप तिचे आजन्म रक्षण करण्याचे वचन तिला देतो. तसेच ओवाळणीत काही भेटवस्तूही तिला देतो. तसेच बहिणही आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.1