राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिमानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो. २०१९-२०२० वर्षातील पद्म सोहळ्यात महाराष्ट्रातील १९ जणांना पद्मश्री तर दोघांना पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. महाराष्टासाठी ही अभिमानाची बाब आहे. पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्यातील हे क्षण बघून महाराष्ट्रातील जनतेचा ऊर भरून आला.