राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्याचा दुसरा टप्पा ९ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात १०५ वर्षांच्या तामिळनाडूतील आजींना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. या आजींचे नाव रंगममाल पपममाल असे असून कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारण्यासाठी आलेल्या या आजींपुढे सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी देखील हात जोडलेले पाहायला मिळाले.