शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे १५ नोव्हेंबर २०२१ रोजी अनंतात विलीन झाले. बाबासाहेब पुरंदरे हे दानशूरतेचं उत्तम उदाहरण होते. त्यांनी अनेक संस्था आणि लोकांना सढळ हाताने मदत केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या या दानशूरता स्वभावाचा अनुभव त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शैला अनिल चोंदे यांना देखील आला आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागात काम करणाऱ्या शैला चोंदे यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वेळोवेळी मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
#BabasahebPurandare #बाबासाहेबपुरंदरे #शिवशाहीर #Maratha #chhatrapatishivaji #History #Historian
For my daughters education Expressed by a woman living next to Babasaheb Purandare