विठ्ठल-रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी केला संपाच्या नव्या दिवसाला प्रारंभ

Lok Satta 2021-11-15

Views 138

राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कार्तिकी एकादशीच्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेऊन संपाच्या नव्या दिवसाला प्रारंभ केला आहे. बीड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिंडी काढून सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. तर आझाद मैदानात विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करुन एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली.

#MSRTC #Protest #Dindi #Pandhurang #Ekadashi #UddhavThackeray

With the blessings of Vitthal-Rukmini ST workers started a new day of strike

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS