Kartiki Ekadashi | बेघरांची वारी ; पांडुरंगाच्या दारी | Sangli |Sakal
सांगली :अनाथांचा नाथ म्हणून विठूरायाकडे पाहिले जाते. त्याची पुजा म्हणजे मानवता, हा सहजधर्म. मानवतेच्या दृष्टीने येथे सुरू असलेल्या सावली बेघर निवारा केंद्रात विठ्ठल हा मनोभावे पुजला जातो. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने केंद्रातील तीसहुन अधिक बेघरांनी साक्षात विठ्ठलाची आराधना करून पायी दिंडी काढली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, भगवे झेंडे, डोक्यावर पांढरी टोपी, ओठी विठ्ठलाच्या नामाचा गजर करत निघालेली ही दिंडी जणू त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनालाच निघाल्याचे चित्र होते.
#KartikiEkadashi #Sangli #Wari