मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग गेले कित्येक दिवस बेपत्ता आहेत. खंडणी प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे परमबीर सिंग यांना मुंबईच्या किल्ला कोर्टाने फरार घोषित केलं आहे. यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.