District bank election | अन्यायाविरोधात उचललेलं पाऊल यशस्वी ठरलं - इंदिरा घार्गे | Sakal
वडूज : प्रभाकर घार्गे साहेबांच्या सहभागाशिवाय जिल्हा बँकेची निवडणूक हा आमच्या कुटूंबावर आलेला बाका प्रसंग होता. आम्हाला या निवडणूकीसाठी सामोरे जावे लागले. मी व माझ्या मुली प्रिती, प्रिया रात्रं दिवस प्रचारासाठी फिरलो, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, रणजितसिंह देशमुख व कार्यकर्त्यांनी आम्हाला खंबीर साथ देत भावासारखी आपली पाठराखण केली. कार्यकर्ते व मतदारांनीही घार्गे साहेबांच्या कामावर विश्वास दाखवित तालुक्याचा स्वाभीमान जपला. अन्याया विरोधात लढणं हे आमच्या रक्तातच असल्याने अन्यायाविरोधात उचललेले पाऊल यशस्वी ठरल्याची भावना सौ. इंदिरा घार्गे यांनी ई-सकाळशी बोलताना व्यक्त केली. (व्हिडिओ : आयाज मुल्ला)
#Satara #Waduj #Districtbankelection #IndiraGharge