राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मतानं पराभव झाला. त्यांच्या या पराभवावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. दरम्यान, आता शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं पवार यांनी म्हटलं आहे.
#sharadpawar #shashikantshinde #politics #sakal