करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनने कल्याण-डोंबिवली महापालिकेची चिंता वाढवली आहे. परदेशातून कल्याण-डोंबिवली शहरात आलेल्या प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रोन या करोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मास्क न लावल्यास महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.