शिर्डीतील साई संस्थानचे प्रसादाचे लाडू विक्री केंद्र पुन्हा सुरू झाले आहेत. २५ रुपयांत तीन लाडूंचे पॅकेट मिळणार आहेत.
करोनाच्या काळात एप्रिलपासून प्रसादाचे केंद्र बंद होते.लाडू विक्री केंद्र बंद असल्याने व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री सुरू केली होती.दुकानदारांकडून भाविकांना वाढीव दरात लाडूची विक्री केली जात असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत भाविक होते.साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, अशी भाविकांची मागणी होती.अखेर साई भक्तांची मागणी पूर्ण झाली.