कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर शहर आणि परीसरात गव्याचे दर्शन होत आहे. आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी औद्योगिक पंचतारांकित वसाहतीच्या पिछाडिस (कागलजवळ) पश्चिम बाजूला कोल्हापूर शहराजवळ दुसरा गवा आढळला आहे. गेल्या दोन दिवसापासून शहरात धुमाकुळ घातलेला गवा हा शिये-भुये या मार्गाने जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
बातमीदार ; शिवाजी यादव
व्हिडिओ-बी.डी.चेचर