Akola Viral Video | प्रेमीयुगुलाला मारहाण; मुलीला काढायला लावला बुरखा | Sakal Media
बाळापूर (जि. अकोला) : अकोला-शेगाव मार्गावरील गायगाव येथील इंडियन ऑईल डेपो जवळ प्रेमीयुगलाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये शिवीगाळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. युवतीने बुरखा घातल्याने युवकाला नागरिकांनी मारहाण केली. मारहाण झालेला युवक आणि बुरखा घातलेली युवती यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही दुचाकीवरून जात होते. ओळख पडू नये म्हणून युवतीने बुरखा घातला होता. काही युवकांनी त्यांना गायगाव येथील इंडियन ऑईल डेपोसमोर अडविले. यानंतर त्यांनी युवकास मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. (व्हिडिओ - जयेश गावंडे)
#AkolaViralVideo #Crime #IndianOilDepo #akola #ViralVideo