#kolhapur #sanvidhan #constitution #constitutionofindia #indianconstitution
Kolhapur: कोल्हापूरातील लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्रातर्फे 12 दिवस 12 तालुक्यांमध्ये संविधानाचा जागर करण्यात आला. 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर म्हणजेच 'संविधान स्विकृती दिन ते आंबेडकर महापरिनिर्वाण दिन' या दरम्यान ही यात्रा काढण्यात आली. या काळात शाळा, बचत गट, गावाची चावडी अशा अनेक ठिकाणी 60 हून अधिक कार्यक्रम करुन संविधानाचा प्रचार आणि ओळख करुन देण्यात आली.