पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मनसे सैनिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी १५ डिसेंबर २०२१ रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेत वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याची माहिती दिली. परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रति असलेला आदर आणि भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. तसंच योग्य वेळ आल्यावर सगळ्यांना उत्तर देणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
#rupalipatil #RajThakrey #MNS #pune