मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात जामिनावर असलेला आर्यन खान याला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास आता एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे गेला असल्याने आता दर आठवड्याला शुक्रवारी आर्यनला एनसीबी मुंबईच्या कार्यालयात हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.