Devendra Fadnavis criticized the Mahavikas Aghadi | फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका | Sakal Media

Sakal 2021-12-15

Views 1.1K

Devendra Fadnavis criticized the Mahavikas Aghadi | फडणवीसांची महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका | Sakal Media
राज्य सरकारच्या ओबीसींसाठीच्या सर्व मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणूका घेण्याचे आदेश आहेत. खरंतर केंद्र सरकारने आजही पुन्हा स्पष्ट केले के आमच्याकडे असलेले डाटा हा केवळ सामाजिक-आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचा डाटा आहे, आणि ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याकरता न्यायालयाला राजकीय दृष्ट्या मागास सिद्ध करणारा डाटा हवा आहे. केंद्र सरकारने असा कोणताही सर्वे केलेला नाही. त्यामुळे आपल्याकडे असलेले डाटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा 'ट्रिपल टेस्ट' मध्ये बसणारा नाही. असेही केंद्राने न्यायालयात स्पष्ट केले. आम्ही देखील आतापर्यंत हेच सांगत होतो.
#DevendraFadnavis #OBC #OBCReservation #PoliticalReservation #MahavikasAghadigovernment

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS