#OmicroneVariant CoronaVirus #NewVariant #MaharashtraTime
संपूर्ण जगात कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रोन विषाणूची धास्ती वाढली आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. डोंबिवली, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, लातूर, वसई विरार तसेच बुधवारी बुलढाणा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यात 2 तर मुंबईत आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या चार वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एकूण रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. 32 पैकी 25 जणांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.