केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या अजातशत्रू स्वभावासाठी ओळखले जातात. सर्वच पक्षांमध्ये गडकरींचा मित्रपरिवार असल्याचं अनेक प्रसंगी दिसून येतं. यातूनच गडकरींचे राजकीय किस्से चर्चेत असतात. मुंबईच्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन हायवे’ या परिषदेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकिर्दीत घडलेले काही किस्से सांगितले. यावेळी धिरुभाई अंबानींचं टेंडर आपण नाकारलं, तेव्हा नेमकं काय झालं होतं, हे गडकरींनी सांगितलं.