शिवसेनेचे नेते रामदास कदम हे पक्षाला 'राम राम' करणार अशी चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत वाद सुरू होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते त्या वेळी रामदास कदम यांच्याकडे मंत्रीपद होते. आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आले. पत्रकार परिषदेत 'उद्धव साहेब, पक्षाची वाईट वेळ असताना मी सर्वांना अंगावर घेतलंय' असं म्हणत आपली खंत बोलून दाखवली.