ब्रिटनमध्ये शुक्रवारी ९३ हजार ४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. हे आकडे पाहून जगभरातील तज्ञ चक्रावले आहेत. कारण, ओमायक्रॉनच्या एंट्रीनंतर ब्रिटनमध्ये करोना रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक झालाय. युकेमध्ये नव्या ९३ हजार रुग्णांसह १११ मृत्यूंचीही नोंद करण्यात आलीय. फक्त ब्रिटनच नाही, तर फ्रान्स आणि इतर युरोपियन देशांमध्येही करोनाचा उद्रेक झाल्याचं चित्र आहे. जाणकार याकडे तिसरी लाट म्हणून पाहत आहेत, त्यामुळे भारतालाही हा तिसऱ्या लाटेचा धोका आहे का, तिसरी लाट आली तर त्याचे परिणाम काय असतील, त्यासाठी आपण तयार आहोत का, ती येऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि सरकारचा ही संभाव्य लाट रोखण्यासाठी मेगाप्लॅन काय आहे हे अत्यंत #सुटसुटीत शब्दात समजून घेणार आहोत.