आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्षातले नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाना साधला. वीज बिलाच्या प्रश्वावरुन त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. नेत्यांचे हट्ट पुरवण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी मार्च पर्यंत हे सरकार सुट द्यायला तयार आहे. ज्या शेतकऱ्यांवर हे सरकार चालत आहे त्याच शेतकऱ्यांना हे सरकार मदत करत नाही आहे. हे सरकार कंजूस, मख्खीचूस आहे. हे दारुवर आधारित असणारं सरकार आहे. कृषीवीज बील प्रश्नी आमदार सुधीर मुनगंटीवार भडकलेले पाहायला मिळाले.