भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा जावळीचे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मागील काही काळापासून शाब्दिक वाद रंगलाय. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधत त्यांना नारळफोड्या गँग असं म्हटलं होतं. याला उत्तर देत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना त्यांच्या स्टाईलने 'काय बाई सांगू? कसं गं सांगू...', अशा गाण्याच्या ओळी म्हणत फिल्मी उत्तर दिलं. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना 'नेमकी लाज कशाची वाटते?', असं विचारात प्रत्युत्तर दिलं आहे.
#udayanraje #ShivendraRaje #satara #elections