अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. श्रीरामपूर शहरात हा रुग्ण आढळला आहे. नायजेरिया येथून आलेल्या कुटुंबातील 41 वर्षीय महिला करोना बाधित होती. सुदैवाने या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर काही जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. सध्या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान श्रीरामपूर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक योगेश बंड यांनी माहीती दिली आहे.